अखिल भारतील लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे 350 गुणवंतांचा सत्कार संपन्न

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लेवा पाटीदार समाजातील 10वी,12 वी, व पदवी पदवीका व पदविव्युत्तर व विविध विद्याशाखांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव समारंभ संतोषी माता हॉल येथे उत्साहात संपन्न झाला.

गुणवंतानाचा सत्कार

कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेशदादा पाटील हे होते.त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी आ.राजुमामा भोळे,आ.संजय सावकारे, महासंघाचे अध्यक्ष ऍड.प्रकाशराव पाटील,नाहटा कॉलेज चेअरमन महेश फालक ,गिरीष महाजन,चेतन पाटील , श्रेयस इंगळे महासंघाचे उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी,शहराध्यक्ष देवा वाणी हे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी आ.राजुमामा भोळे यांनी लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येया कडे वाटचाल करा व आ.सावकारे यांनी ऑनलाईन अभ्यास पेक्षा पुस्तक वाचन करा,अधिकारी बना, शिक्षण घेऊन नोकरी न करता उद्योगधंद्याकडे वळा व अध्यक्षीय भाषणात कुटुंबनायकांनी कितीही उच्च पदावर जा पण आपल्या आई वडिलांना विसरू नका असे सांगून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष ऍड.प्रकाशराव पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.मुकेश चौधरी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्याम भारंबे,उपाध्यक्ष रुपेश चौधरी,सोसिल मीडिया प्रमुख शुभम पाटील, ओम वाणी, संकल्प वाणी, निलेश भारंबे,सागर भारंबे, राहुल नेमाडे,यश बेंडाळे, विनय चौधरी,पूर्वेश चौधरी, गणेश चौधरी,हृतिक फालक,नचिकेत फालक,रोहित नेमाडे,गिरीश चौधरी,भूषण किरंगे,नरेंद्र भडके, निलेश राणे,शुभम झांबरे,कोमल चौधरी, पवन शिंदे,चेतन आंबोले, लोकेश बेंडाळे इ. होते.