आमच्या बद्दल

सामाजिक अस्मिता जोपासून ऐक्य व परिवर्तनाच्या  

समाजाच्या विकासासाठी व्यक्तिमत्व विकसन व   

दिशेने वाटचाल करणाऱ्या ध्येयवादी युवकांची चळवळ तसेच  

विविध उपक्रमांतून समाज दर्शन

विविध सांस्कृतिक कार्यशालाद्वारा व्यक्तिमत्व विकसन करणे  

समाजातील युवकांचे प्रभावी संघटन करून  

सामाजिक बांधिलकी, करियर यांची सांगड घालून

परिणामकारक कामासाठी सिद्धता करणे.

सामाजिक परिवर्तनाची विधायक वाटचाल व  

राजकीय बांधलकी नसलेली समाज परिवर्तनाची

क्रांतीकारक चळवळ.

* संकल्पना *

आमच्या तरुण पिढीवर बेजबाबदारपणाचा, स्वार्थीपणाचा आरोप केला जातो. या बेजबाबदारपणाचे मुळ समाजातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा धार्मीक अशा विविध रचना व परंपरामध्ये शोधता येईल. पण कारण काहीही असले तरी तरूणांची उदासीनता व जीवनाकडे पाहण्याची संकुचीत दृष्टी हे सदर स्थितीतील वास्तव आहे. आयुष्याच्या सुरवातीलाच तडजोड म्हणून सुरक्षित पळवाटा शोधणारे तरूण सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत उदासीन असणारच तर काहीना इच्छा असूनही प्रश्नांना सामोरे जाण्याच्या स्वत: च्या क्षमतेबद्दल शंका असते. संवेदनशीलता, आपल्या कल्पना विश्वातील सुंदर जग वास्तवात दिसत नसल्या बद्दल ची तीव्र अस्वस्थता, आव्हाने स्वीकारणे व ती पेलण्याची धमक असणे ही तारूण्याची लक्षणे आहेत. ही लक्षणे श्रद्धास्थान मानणारे व अंगीबाणवणारे कृतिशिल चिरतरूण समाजाचे भावी नागरीक बनावेत या साठी प्रयत्नरत असणारी अ.भा. लेवा पाटीदार युवक महासंघ ही एक संघटना आहे. 

* ध्येयधोरणे * 

  • समाजाच्या विकासासाठी व्यक्तिमत्व विकसन या ध्येय वाक्यावर आधारीत उपक्रमांचे आयोजन. युवकांमध्ये अस्मिता व स्वाभिमान जागृत करून सामाजिक जाणीवा वाढविणे.
  • समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी त्यांची व्यक्तिमत्वे समर्थ करणे आणि त्याद्वारे सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये एक विधायक योगदान करण्यासाठी अ.भा. लेवा पाटीदार युवक महासंध कार्यरत राहील.
  • कोणत्याही विशिष्ट तत्व प्रणालीचा आग्रह न धरता व्यक्तीच्या क्षमता, स्वभाव व परिस्थितीनुसार सामाजिक विकासाचे विविध मार्ग प्रभावी ठरू शकतात असा आम्हाला विश्वास वाटतो.
  • त्या दृष्टीने सर्वच सामाजिक जाणीवेतून काम करणाऱ्या व्यक्ती संघटना यांच्याशी महासंघाची समन्वयाची, सांमजस्याची तसेच परस्पर आदराची व सहकार्याची भावना आहे.

* उद्दीष्टये * 

  • सर्व समाजात एकोपा, प्रेम, सहकार्य व बंधुत्वाची भावना निर्माण करून जुन्या व नव्या रिती रिवाजात सामंजस्याने सुसंवाद व परिवर्तन घडवून आणणे त्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन करणे तसेच चर्चासत्रे, कथाकथन, व्याख्यानमाला, मेळावे इ. आयोजीत करणे.
  • सर्व समाजातील गरीब होतकरू, हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे तसेच अनाथ, दुर्बल, विधवा, परितक्ता, अपंग वृद्ध यांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविणे उदाहरण: गृह व लघुउदयोग, प्रशिक्षण व्यवसाय मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे तांत्रिक शिक्षण वर्ग चालविणे शिक्षण वर्ग, टायपींग, कॉम्प्यूटर इ.
  • युवकांच्या शारिरीक, मानसिक व सर्वागीण विकासासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, व्यायाम शाळा, क्रीडास्पर्धा, योगपरिषद व शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र चालविणे.
  • अनाथालय व बालसंस्कार केंद्र, प्रौढ शिक्षण वर्ग चालविणे व आपदग्रस्तांना मदत करणे.
  • मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे व धर्मार्थ दवाखाना, शिबीरे आयोजीत करणे.
  • युवकामध्ये सामान्य ज्ञान, व्यावहारीक, औदयोगिक, शेती वगैर विषयांचे सखोल ज्ञान वाढीस लावण्यासाठी ग्रंथ मंदीर (वाचनालये) स्थापन करणे.
  • राष्ट्रीय विकासाच्या कार्यक्रमात सहभागी घेऊन राष्ट्रप्रेम व भक्ती जागृत करणे.  
  • अ.भा. लेवा पाटीदार युवक महासंघाचे कार्य व प्रसिद्धी राजकीय क्षेत्रा पासून अलिप्तता बाळगील व त्याप्रमाणे कार्य करील.
  • लेवा पाटीदार समाजाच्या उत्कर्ष व प्रगतीसाठी युवतीसंघ, उदयोजक आघाडी, वैदयकीय आघाडी, प्रज्ञावंत आघाडी आदी स्थापन करून कार्य चालाविणे.

* आचारसंहिता *

  • प्रत्येक कार्यकत्याने महासंघाच्या प्रत्येक कार्यक्रमात, संबंधित शाखेच्या मासिक सभेत सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक कार्यकर्त्याने वरिष्ठांच्या सुचनेचे आज्ञेचे पालन करावे.  
  • प्रत्येक कार्यकत्याने कमीत कमी दहा नवीन कार्यकर्ते जोडावे.
  • संघटने विषयी सभासदांच्या काही तक्रारी किंवा सुचना असल्यास त्या त्यांनी संबधीत शाखेच्या अध्यक्षाकडे मासिक सभेत अध्यक्षांच्या परवानगीने मांडावेत. इतर कुठेही त्या बद्दल जाहीर वाच्यता वा चर्चा करू नये.
  • कार्यकर्त्याने महासंघाच्या विचारांचा, कार्याचा प्रसार व प्रचार करावा.
  • महासंघा विषयी अपप्रचार करणाऱ्या व्यक्तिस महासंघाची ध्येय व धोरणे व कार्याची माहिती देऊन त्यांचे मनपरिवर्तन करावे.
  • समाज ऐकया चे भान ठेऊन इतर जाती धर्मा बद्दल अपप्रचार किंवा अपशब्द वापरून समाजशांती बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी मात्र जर कोणी विनाकारण आपल्या समाजास अपशब्द वापरत असेल तर त्यास कडक शब्दात समज देऊन ही बाब महासंघाच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दयावी.
  • शाखांनी उपशाखांनी संघाच्या कार्यसुलभते साठी स्टेशनरी छापायची असेल तर तशी लेखी परवानगी घ्यावी. परवानगी न घेता लेटरपॅड, व्हिजिटींग कार्ड इ . स्टेशनरी छापु नये तसे आढळल्यास त्या शाखेला दोषी धरून बरखास्त करण्याची शिफारीस केंद्रिय कार्यकारिणी करू शकते.
  • आपणास जमेल तशी यथाशक्ती प्रत्येक कार्यकरयान आपल्या समाजबांधवास तन, मन आणि धनाने मदत करण्यात सदैव पुढे असावे.
  • प्रत्येक कार्यकत्याने जीवनात, महासंघाच्या सभेत, मेळाव्यात, जाहीर समारंभात शिस्तबद्ध वर्तन ठेवावे. आपल्या योर परंपरांना आदांना धक्का लागेल असे वर्तन आपल्या हातून घडू देऊ नये. 

* सदस्यता *

सामाजिक बांधिलकी मानणारे व त्या विचारातुन आयुष्यात काही कृति करू इच्छिणारे युवक – युवती लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य बनु शकतात. सदस्य होण्यासाठी कार्यकर्त्यास एक शपथपत्र भरावे लागेल. सदस्यता फी वार्षिक सक्रिय सभासद फी रू.१००/- व प्रवेश फी रू.५/- या प्रमाणे एकूण रू.१०५ /- राहील साधारण वार्षिक सभासद फी रू.११/- राहील.

* आवाहन *

युवाशक्ती हिच समाजपरिवर्तनाचे साधन आहे. युवक आणि युवर्तीनी विधायक कार्यातून व्यक्तिमत्व विकसन, व्यक्तिमत्व विकासातून समाजोन्नतीसाठी संघटीत व्हा असे आवाहन अ.भा. लेवा पाटीदार युवक महासंघाच्या व्यासपीठावरून करण्यात येत आहे. काही तरी वेगळे अर्थपूर्ण करण्याची ओढ असलेल्या युवा मनापुढे काही दिशा, पर्याय मांडण्याचा हा प्रयल आहे. स्वत:चा विकास व सामाजिक काम यांची सांगड घालून अर्थपूर्ण आयुष्य घडवू पाहणाऱ्या सर्व युवक युवर्तीना सदस्य बनण्याचा आग्रह आहे. सदस्य न होताही विविध उपक्रमात सहभागी होणाऱ्यांचे स्वागत आहे.

या पवित्र उदात्त अशा रचनात्मक विधायक कार्यासाठी आपण सारे कटीबद्ध आहोत! या साठी आम्हाला आवश्यकता आहे आपल्या खंबीर, बळकट व प्रेमळ अश्या अमुल्य सहकार्याची! अपेक्षा आहे समाजातील थोर प्रतिष्ठीत व विद्वानांच्या मार्गदर्शनाची व प्रेमळ आर्शिवादाची…….. 

* शाखांसाठी कार्यक्रम मार्गदर्शीका *

  • सरदार वल्लभभाई पटेल जयंती (३१ आक्टोबर) व पुण्यतिथी (१५ डिसेंबर) स्थानिक शाखीय पातळीवर साजरी करणे.
  • बहिणाबाई जयंती (नांगपंचमी) व पुण्यतिथी (३ डिसेंबर) साजरी करावी.
  • संबंधित शाखेने आपल्या गावातील इ .१ ते १० वी पर्यंतच्या विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ घ्यावा.
  • निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण तसेच पाणीअडवा -पाणी जिरवा अश्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजीत करावे.
  • प्रत्येक शाखेने मासिक सभा व सर्वसाधारण सभा (वार्षिक) घेणे आवश्यक राहील. त्याप्रमाणे या सभांचे इतिवृत्त व इतर जमा खर्चाचा हिशोब ठेवणे आवश्यक आहे व हिशोब तालुका कार्यकारीणीच्या अंतर्गत हिशोब तपासनीसा कडून तपासून घ्यावा.
  • महासंघाच्या उद्दीष्ट्यांच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करावे.
  • महासंघाच्या कार्यक्रमांमध्ये, सभांमध्ये पक्षीय राजकारण, तसेच कार्यकर्त्यांमधील अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन असता कामा नये आपसात काही वाद-विवाद असल्यास ते शांततेने व सांमजस्याने सोडवावे. वार्षीक स्नेहसंमेलनाचे आयोजन स्थानिक पातळीवर करण्यात यावे. सदर स्नेहसंमेलनात विविध कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्याच प्रमाणे बालदिनानिमीत्त (१४ नोव्हेंबर) बालमहोत्सवाचे आयोजन करावे.
  • कार्यक्रम व कार्य करतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक अनुभवी व जाणकार व्यक्तींचा समावेश असलेली सल्लागार समिती नेमण्यात यावी व त्यांचा सल्ला विचारात घेऊन कार्य करावे.